आरबीआयच्या रडारवर आणखी 5 बॅंक
rbibank आरबीआयच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या बॅंकाविरोधात आरबीआयने कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. आता या 5 सहकारी बॅका आरबीआयच्या नजरेत आल्या आहेत. ज्या अंतर्गत या बॅंकांना 60.3 लाख रुपयांचा दंड लावण्यात आलाय. यामध्ये जिल्हा सहकारी बॅंक देहरादून, द कांगडा को-ऑपरेटिव्ह बॅंक नवी दिल्ली, राजधानी नगर सहकारी बॅंक लखनौ, राजकोट नागरिक सहकारी बॅंक आणि जिल्हा सहकारी बॅंक गढवाल यांचा समावेश आहे.